म्युच्युअल फंडावर बोलू काही

  • Home
  • म्युच्युअल फंडावर बोलू काही

म्युच्युअल फंडावर बोलू काही I am very passionate about promoting financial literacy in society.

ARN-181045
AMFI Registered Mutual Fund Distributor and Insurance Advisor, I offer unbiased, research-backed guidance across MF investments, life & health insurance.

06/11/2025

SWP संदर्भात एक मुद्दा सांगावासा वाटतो. समजा आपण वार्षिक 500000 म्हणजे महिना साधारणतः ४०-४२ हजार SWP मधून‌ घेण्याचा पर्याय घेत आहात. आपल्या ५ लाखांच्या वार्षिक विड्रावल मध्ये जर १.२५ लाखांपेक्षा कमी लॉंग टर्म कॅपिटल गेन बुक होत असेल तर मिळणाऱ्या सगळ्या फायद्यावर काही ही कर भरावा लागणार नाही. मात्र १.२५ लाखापेक्षा जास्त रकमेवरच १२.५% कर भरावा लागेल.

उदाहरणार्थ, समजा मी एका वर्षात दहा लाख रुपयांचं इक्विटी ओरिएंटेड फंडस् मधून विड्रावल घेतलं, आणि माझा २ लाख रुपयांचा लॉंग टर्म कॅपिटल गेन बुक झाला, तर १.२५ लाख टॅक्स फ्री होऊन फक्त ७५ हजारांवरच १२.५% दराने कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. जो साधारणतः ९५०० च्या आसपास येईल. मी असा विचार केला की मी एकूण २ लाखांचा फायदा कमावला परंतु मला फक्त ९५०० म्हणजे जवळपास ५% टक्क्यांपेक्षा ही कमी कर भरावा लागला, तर ही फायद्याची गोष्ट असेल‌ जर माझं उत्त्पन्न १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर. ते जर १२ लाखांपेक्षा कमी असेल तर मात्र हे फायद्याचं होणार नाही.

पण सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे जर मला १.२५ लाखांपेक्षा कमी LTCG बुक करण्याइतकंच विड्रावल करायचं असेल तर मात्र शून्य टॅक्स लागेल. साधारणतः रिटायरमेंट पर्यंत सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आणि औषधांवर फारसा खर्च नसणाऱ्या, स्वत:चं घर असणाऱ्या, डोक्यावर कर्ज नसणाऱ्या मध्यमवर्गीय जोडप्याला आजही महिना ४०-४२ हजारांची SWP पुरेशी होईल. आणि आधिकच्या उत्त्पन्नाकरिता दुसरा सोर्स म्हणून बॅक FD, SCSC हे पर्याय आहेतच.

जर मी लाभांशाचा पर्याय स्वीकारला तर मात्र मला वार्षिक १०००० पेक्षा जास्त लाभांश मिळत असेल तर म्युच्युअल फंड कंपन्या दहा टक्के दराने TDS कापून घेतील, जो ITR फाईल केल्यानंतर जर माझं उत्त्पन्न किमान taxable income पेक्षा कमी असेल तर मला टॅक्स रिफंड मिळेल.

माझं "म्युच्युअल फंडावर बोलू काही...." हे यू ट्यूब चॅनेल जरूर पहा. सर्च करा

*किरण कुळकर्णी*

20/08/2025
म्युच्युअल फंडाच्या साहाय्याने आर्थिक नियोजन आणि करबचतीसह संपत्तीनिर्मिती साठी अवश्य कॉल करा.
03/07/2025

म्युच्युअल फंडाच्या साहाय्याने आर्थिक नियोजन आणि करबचतीसह संपत्तीनिर्मिती साठी अवश्य कॉल करा.

Address


421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when म्युच्युअल फंडावर बोलू काही posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to म्युच्युअल फंडावर बोलू काही:

Shortcuts

Share