Atharva Investments & Consultants

Atharva Investments & Consultants Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atharva Investments & Consultants, Financial Consultant, PRATHMESH APARTMENT, NEAR SHIAJI NAGAR, Chiplun.

26/11/2025

चिपळूण शहरातील गेली पाच वर्षे रखडलेले एसटी स्टॅन्ड किंवा महाराष्ट्र शासनाचे सरकारी कॉन्ट्रॅक्टरची कथित 50000 कोटी देय बिले थकलेली असताना सरकार फक्त चिपळूण शहर विकासासाठी 2000 कोटी कसे काय देणार आहे? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आला पाहिजे!

महाराष्ट्र राज्यात नगर परिषदा व नगरपंचायत साधारण पणे अंदाजे 400 आहेत, तर 29 महानगरपालिका आहेत, त्या सर्व ठिकाणी निवडणुका आहेत, तेव्हा सरकार तर्फे प्रत्येक ठिकाणी खिरापत वाटल्याप्रमाणे 1000-2000 कोटींची आश्वासने दिली जाणार आहेत. उद्या उपमुख्यमंत्री चिपळूण मध्ये येणार आहेत ते देखील मोठमोठ्या चिपळूण विकास कामांच्या घोषणा करणार आहेत. प्रश्न हा आहे की फक्त 44000 कोटी लाडकी बहीण योजनेवर खर्च करताना (जो विकास कामावरील खर्च म्हणून गणला जाणार नाही ) व शासनाच्या तिजोरीत खडखडात आहे. मुंबई गोवा महामार्ग काय अवस्थेत आहे आणि काय दर्जाचे काम चालू आहे, हे देखील सर्व जण पाहतच आहेत. असं असताना शासन एका शहरासाठी 2000 कोटीचे आश्वासन देते, ही आश्चर्यची बाब आहे. लोकांची मेमरी खूप कमी असते, जनतेला दिलेली आश्वासने ती लवकर विसरते हे राजकारण्यांना पण फार चांगल्या पद्धतीने माहित असते. त्यामुळे कोणताही पक्ष, त्यांचे नेते व सरकार मधील मंत्री आणि लोकप्रतिनिधी ही अशी आश्वासने देतच असतात, त्यात कोणाला काही गैर वाटणार नाही.

मात्र ही आश्वासने प्रत्यक्षात किती येतील, हवेत किती विरतील आणि पुढील पाच वर्षात खरोखरच लोकांच्या पदरी किती पडतील हे देखील पाहणे गरजेचे आहे. लोकांनी देखील शासन, पक्ष नेते, राजकारणी, मंत्री, नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे वेळोवेळी अशी आश्वासने देतील ती विकासकामे का झाली नाहीत, हे विचारण्याचे धाडस केले पाहिजे.

या देशातील जनता फिल्म स्टार, क्रिकेटर व त्यानंतर राजकारणी यांची मोठी फॅन आहे. त्यांना जनता वेड्यासारखी follow करीत राहते. त्यांनी केलेले सर्व गुन्हे, चुका जनता माफ करते किंवा विसरून जाते.

जनतेने यावेळेस त्यांना मिळणारे सर्व उमेदवार व पक्षाचे जाहीरनामे जपून ठेवावेत व उमेदवार निवडून आल्यावर आपल्या वार्डातील नगरसेवक, नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या जाहीरनामा्यातील कामे कधी होणार हे विचारण्याचे धाडस केले पाहिजे.

यावेळेस चिपळूणमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्यातील 80% नवीन उमेदवार आहेत, त्यांना कौन्सिल कशी चालते त्यांचा अनुभव नाही, नसू शकतो. पण कमीतकमी नगरपरिषद अधिनियम काय आहेत याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर आज *26 नोव्हेंबर संविधान दिन* आहे, आजच्या दिवशी सर्व उमेदवार एकत्र येऊन किंवा लोकांच्या घरी जाऊन किंवा त्याना भेटताना *मी भारताचे संविधान साक्षी ठेवून नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून काम करेन* असे सांगतील का? आणि त्याप्रमाणे काम करतील का हाच खरा प्रश्न आहे!

संजय चव्हाण
कर व गुंतवणूक सल्लागार
चिपळूण, 9403936301
# # 26 नोव्हेंबर संविधान दिन

जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान!!

16/11/2025

बाटली बंद पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते

15/11/2025

आज सकाळी कोल्हापूरला जाताना सकाळी 7 वाजता कुंभार्ली घाटात एक पोलीस हवालदार एकटेच private car लावून ट्रक कडून पॆसे घेताना दिसलें. इतक्या सकाळी कर्तव्य तत्परता बघून खूप समाधान वाटले! संबंधित शिरगांव किंवा अलोरे पोलीस ठाण्याने कृपया याची दखल घेऊन त्या कर्तव्य कठोर पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित करावे, ही विनंती!!🙏

#15.11.2015

01/12/2024

चिपळूण मधील प्रथितयश कर व गुंतवणूक सल्लागार (Tax & Investment Consultant) यांचे ऑफीस साठी Lady स्टाफ हवा आहे.

- महाविद्यालयीन विद्यार्थी पार्ट टाईम साठी संपर्क करू शकतात
- कॉमर्स विद्यार्थी व संगणक माहिती असणाऱ्यास प्राधान्य

आपले Resume [email protected] या ई-मेल / Whatsapp No 9403936301 वर पाठवावेत

01/12/2024

इन्शुरन्स जरुरी है ! स्टार हेल्थ आणि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स साठी संपर्क 9403936301, संजय चव्हाण, विमा सल्लागार, चिपळूण

01/12/2024
30/11/2024

आमच्या येथे खालील इन्शुरन्स कंपन्याची सेवा मिळते

- *हेल्थ इन्शुरन्स / आरोग्य विमा : स्टार हेल्थ / आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स*

- *टर्म इन्शुरन्स : HDFC Life / Tata AIA Life Insurance*

- *Vehicle इन्शुरन्स : ICICI Lombard / Chola Insurance / Go Digit, इत्यादी*

संपर्क :
*संजय चव्हाण, अथर्व इन्व्हेस्टमेंटस, विरेश्वर कॉलनी, चिपळूण, 9403936301*

शेअर मार्केट जवळजवळ 12% खाली आलेले आहे, ही म्युचुअल फंडमध्ये एकरकमी किंवा SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची एक नामी ...
15/11/2024

शेअर मार्केट जवळजवळ 12% खाली आलेले आहे, ही म्युचुअल फंडमध्ये एकरकमी किंवा SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची एक नामी संधी देते. १००% ऑनलाईन गुंतवणूक प्रोसेस करून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी संपर्क : संजय चव्हाण, अथर्व इंवेस्टमेंट्स, AMFI रजिस्टर्ड Mutual Fund Distributor, 9403936301

शेअर मार्केट जवळजवळ 12% खाली आलेले आहे, ही म्युचुअल फंडमध्ये एकरकमी किंवा SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची एक नामी ...
15/11/2024

शेअर मार्केट जवळजवळ 12% खाली आलेले आहे, ही म्युचुअल फंडमध्ये एकरकमी किंवा SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची एक नामी संधी देते. १००% ऑनलाईन गुंतवणूक प्रोसेस करून इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी संपर्क : संजय चव्हाण, अथर्व इंवेस्टमेंट्स, 9403936301

Address

PRATHMESH APARTMENT, NEAR SHIAJI NAGAR
Chiplun
415605

Telephone

+919403936301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atharva Investments & Consultants posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share