GPL Marketing

GPL Marketing --

प्रति,मा. मुख्याधिकारी साहेब,नगर परिषद वाशिम,जिल्हा - वाशिम (महाराष्ट्र).विषय: शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार...
30/05/2026

प्रति,
मा. मुख्याधिकारी साहेब,
नगर परिषद वाशिम,

जिल्हा - वाशिम (महाराष्ट्र).

विषय: शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डात 'इमर्जन्सी नंबर'चे फलक (बोर्ड) लावण्याबाबत विनंती अर्ज.

महोदय,
उपरोक्त विषयान्वये आम्ही आपले लक्ष वाशिम शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर समस्येकडे वेधू इच्छितो. गेल्या काही दिवसांत आपल्या वाशिम शहरातील लाखाला भागात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या आणि चेन स्कॅन्चिंग च्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.या भागात सर्व बँका आणि शैक्षणिक परिसर असल्यामुळे नेहमी वर्दळ असते, यामुळे भागातील नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गामध्ये कमालीचे भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेकदा एखादी संशयास्पद घटना घडत असताना किंवा चोरी होत असल्याचे लक्षात आल्यावर, नागरिकांना वेळेवर पोलीस स्टेशन, रात्रीची गस्त घालणारे पथक किंवा संबंधित आपत्कालीन विभागाचे संपर्क क्रमांक (Emergency Numbers) तात्काळ मिळत नाहीत. वेळेवर संपर्क न झाल्यामुळे चोरांना पळून जाण्यास मोकळीक मिळते.
जर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक वॉर्डातील मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि रहिवासी भागांत ठळक अक्षरात आपत्कालीन संपर्क क्रमांकांचे बोर्ड लावण्यात आले, तर नागरिकांना मोठा आधार मिळेल.
या फलकांवर (Boards) प्रामुख्याने खालील क्रमांकांचा समावेश असावा:
स्थानिक पोलीस स्टेशन आणि नियंत्रण कक्ष (Control Room) क्रमांक.
संबंधित वॉर्डाचे पोलीस बिट अंमलदार (बीट मार्शल) यांचा मोबाईल क्रमांक.
नगर परिषद आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दल क्रमांक.
वॉर्डातील प्रमुख लोकप्रतिनिधी व जबाबदार अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक.
असे माहिती फलक प्रत्येक वॉर्डात लावल्यास नागरिक संकटसमयी तात्काळ पोलिसांशी किंवा प्रशासनाशी संपर्क साधू शकतील, ज्यामुळे चोऱ्यांच्या घटनांना पायबंद बसेल आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल.
तरी प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून जनहितासाठी व शहराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वॉर्डात तात्काळ 'इमर्जन्सी नंबर'चे बोर्ड लावण्याची कार्यवाही करावी, सोबत लाखाला परिसरातील प्रलंबित पोलिस चौकी ची लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती.
सहकार्याची अपेक्षा!

आपले नम्र सर्व
लाखाला सुरक्षा मंच,
समस्त नागरिक
वाशिम, महाराष्ट्र.

Happy to assist u on whats app messenger regarding your Home loans queries from Paschim Vidharbha area.       Navin Shar...
18/01/2026

Happy to assist u on whats app messenger regarding your Home loans queries from Paschim Vidharbha area. Navin Sharma

Address

D-33, MADHAV NAGAR
Delhi
444505

Opening Hours

Monday 9:30am - 7:30pm
Tuesday 9:30am - 7:30pm
Wednesday 9:30am - 7:30pm
Thursday 9:30am - 7:30pm
Friday 9:30am - 7:45pm
Saturday 9:30am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GPL Marketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to GPL Marketing:

Share