13/11/2022
शेअर मार्केट शिकण्यासाठी काय कराल?
चार्ट पाहून मार्केट शिकता येत नाही , किंवा क्लास केले आणि त्यावरून शेअर मार्केट शिकता येत नाही.. क्लास घेतात खूप लोक आणि सांगतात की कोणता पॅटर्न झाला की काय करायचे पण चार्ट वरून ट्रेड करणारे जवळपास 80% लोक लॉस मध्ये आहेत.
मग नेमके काय केले पाहिजे. माझा चार्ट ला विरोध नाही.. पण त्या बरोबर इतर गोष्टी पण लक्षात घेतल्या पाहिजेत.
मला वाटतं खालील गोष्टी शेअर मार्केट मध्ये ऑप्शन्स मध्रे ट्रेडिंग करताना खूप महत्वाच्या आहेत.
1- ग्लोबल मार्केट ट्रेण्ड ज्या मध्ये अमेरिका , युरोप , चीन हाँगकाँग हे मार्केट महत्वाचे.. ते जर वाढले तर आपण वाढतोच आणि पडले तर पडतोच... हेच SGX निफ्टी दाखवत. ही मार्केट फ्युचर मध्ये ट्रेड चालू असतात ..त्यामुळे आपण ट्रेडिंग करताना त्याचा कडे पाहूनच करायला पाहिजे.
2- बाँड मार्केट जे सध्या खूप चर्चेत आहेत त्यावर पण लक्ष दिले पाहिजे... बाँड मार्केट मुळे व्याजदर काय होतील ह्याचा अंदाज येतो , जेवढे बाँड मार्केट वाढलेले तेवढे मार्केट साठी खराब.
3- महागाई आकडे , किंवा इकॉनॉमी डाटा आपल्याला समाजाला पाहिजे , त्या वरून आपण अंदाज लावू शकतो की मार्केट काय होऊ शकते ..
4- ग्लोबल न्यूज
5- कमोडिटी बाजार भाव ज्यात मुख्यत्वे क्रूड ऑइल चे भाव आणि त्या मधील चड उतार आपल्या साठी खूप महत्वाचे आहे .
6- अतिशय महत्वाचे ते करन्सी मूव्हमेंट, रुपया पडला तर मार्केट साठी खूप खराब आहे त्यावर आपले लक्ष असायला पाहिजे.
7- आपल्या कडील इकॉनॉमी डाटा हा मार्केट ट्रेण्ड समजण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे , ज्या मध्ये GDP, CPI , WPI ,IIP , MPC meeting व बरेच काही ..ह्याची सविस्तर माहिती असणे गरजेचे aahe . त्यावरून आपल्याला ट्रेड कोणता घ्यायला पाहिजे हे समजते.
8- जेंव्हा वरील माहिती घेऊन आपल्याला आपला ट्रेड कळतो त्या वेळेस मग आपण कोणत्या सेक्टर मध्ये , कोणत्या स्टॉक मध्ये किंवा इंडेक्स मध्रे ट्रेड करणार त्याचा चार्ट ज्या मध्ये 5 मी/ 10मी /15मी /30 मी/1 तास , daily चार्ट ह्याचा अभ्यास करायला पाहिजे.
9- ज्या मध्ये त्रेड घेणार त्याचे IV, VIX , News, OI डाटा समजला पाहिजे तरच ते ट्रेड चांगले होतात.
वरील माहिती सगळी Google वरती फुकट मिळते.. फक्त आपण ती शोधली पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे..
आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्स अप केले तरी चालेल
8262802482.