05/11/2019
*" ग्राहक खरेदी का टाळतो - भाग 1 "*
# # # # # # # #
कधी तुमच्या सोबत हे घडलय का ? कि , सगळं बोलणं झालंय आणि ग्राहक म्हणतो कि , मी विचार करून सांगतो अथवा " मी पुन्हा येईन खरेदीला " ! पण तो काही येत नाही आणि आपली सर्व मेहनत पाण्यात !
या पाठीमागे खूप काही कारणं असू शकतात , पण आपल्याकडून काही गोष्टी होतात आणि अगदी शेवटच्या टप्प्यात ग्राहकाचा मूड बदलतो .
या भागात आपण याची काही कारणे पाहूयात , कुठे होतेय गडबड ???
*(1) अतिउत्साह कमी करा*:
हे खूपदा घडतं , समजा आपली बिझनेस मिंटीग आहे अथवा कोणासमोर प्रेझेंटेशन ला जायचंय तेंव्हा कुठेतरी ऐकलेलं असतंय कि , फुल्ल कॉन्फीडन्स ने जा !
चेहरा हसरा ठेवा !
एनर्जीटीक रहा !
वगैरे वगैरे ..... ब्ला ब्ला ब्ला .
मग गडी , ग्राहकासमोर जातो , जणू काही याला ग्राहकाला पाहून अत्यानंद झालाय !
आपल्या उत्साहाशी ग्राहकाला काही देणे घेणे नाही , त्यांना लाळघोटेपणा केलेला आवडत नाही , ज्यास्तच काळजी दाखवलेली आवडत नाही , कारण साहजिक आहे , हे नाटकी वाटतं !
इथे खरेपणा जाणवत नाही .
ग्राहकाला जर आपण लबाड वाटलो तर संपलंच !
म्हणुन असला नकली गोडवा दाखवू नका , ग्राहक लगेच पकडेल आणि आपल्याकडून खरेदी करणार नाही ,
त्यामुळे सावध रहा ! खरे रहा !
*(2) पिचिंग लांबवू नका*:
खूपदा असं होतं कि ग्राहकाला खूप गोष्टी समजावून सांगाव्या लागतात , आणि सेल्समन लोकांची धारणा बनून जाते कि , खूप जास्त समजावून सांगितलं कि विक्री होईल , तसा सुरू होतो हा सेल्सड्रामा .
मशीनगन चालू व्हावी तसे सेल्समन सुरू होतात ... दणादण .
अरे समोरच्या चा मूड आहे का ? इंटरेस्ट आहे का ? त्याला तेवढा वेळ आहे का ? गरज आहे का ? काही बघत नाहीत . सुरू झाले कि , पाठ केलेलं संपत नाही तोपर्यंत थांबत काही नाही गडी .
सो इंरेटेटींग .
संभाषणाचा साधा सरळ नियम आहे कि , ते टू वे असलं पाहिजे नाहीतर ते निष्प्रभ ठरतं .
वन वे संभाषण : सेल्समन >>> ग्राहक असं असतं , आणि टू वे संभाषण हे एक्सपर्ट >>>> ग्राहक असं असतं
तुम्हाला कोणाकडून खरेदी करायला आवडेल? एक्सपर्ट कडून? का सेल्समन कडून ?
साधं गणित आहे .
समोरच्या ने कंटाळून आपण आता थांबू या म्हणण्याअगोदर आपणच थांबा नं !
जास्त फडफड करून मिठ्ठू मियाँ बनन्यापेक्षा कमी पंख हलवता गरुड बना .
सहज विक्री करता येईल , उंची गाठता येईल .
*(3)PRESSURE ? No-No*:
पिचिंग करून देखील ग्राहक खरेदी करत नसेल तर सेल्स मधील लोकं ग्राहकाला प्रेशर करायला चालू करतात .
घ्या ना सर ,, मस्त आहे , तुमच्या फायद्यांच आहे , पुन्हा स्कीम नाही , आत्ताच घ्या आणि पैशे मला दया .
भौतीक शास्त्राचा नियम सांगतो , एखादया स्प्रिंगला जेवढे दाबाल , तेवढी ती उसळी घेईल .
Psycology मध्ये याला Reactant force म्हणतात , त्यामुळे ग्राहकावर दबाव बनवू नका , विनाकारण चा दबाव निगेटिव परिणाम करील , ग्राहक लगेच No म्हणूण टाकील !
तेल ही गेलं आणि तूप ही गेलं !
बसा मग रिकामे .
त्यापेक्षा , प्रोफेशनली बोला , कामापुरतं बोला आणि ग्राहकाला तुमच्या बाबतीत पॉजीटीव ठेवा , किमान न्यूट्रल तरी . म्हणजे आत्ता नाही पण नंतर तरी तो आपल्याकडून खरेदी करील !
*(4)WIIFM पॉलीसीवर काम करा*
(whats in it for me )
बघा ,, " मी " पेक्षा "आम्ही" जास्त बलवान आहे , आणि "आम्ही" पेक्षा "तुम्ही" जास्त श्रेष्ठ आहे .
मग कोणतंही क्षेत्र असो ,
मी फक्त माझाच स्वार्थ बघीतला तर माझ्यातला मी पणा मला संपवून टाकील.
म्हणून नेहमी , ग्राहकाचं हीत बघा .
वैयक्तीक पणे मी एक व्यापारी आहे , रोज ग्राहकांशी बोलावं लागतं , त्यात कधीही ग्राहकास असं ... विचारत नाही , कि ... "तुम्हाला काय पाहिजे "
तर ,
असं विचारतो कि , "आपल्याला काय पाहिजे ? " म्हणजे काय तर ... दोन बाजू न ठेवता मी पण त्यांच्याच बाजूचा होऊन जातो .
म्हणजे काय , तर त्यांच्या बाजूने जास्त विचार करतो .
कारण ग्राहकाच्या मनात एकच असतं कि , What's In It For Me ?
माझ्यासाठी यात नेमकं काय ?
याचं उत्तर आपण असं दयावं ?
म्हणजे ग्राहक नक्की खरेदी करील .
संग्रहित