SWS Financial Solutions Pvt Ltd.

SWS Financial Solutions Pvt Ltd. AMFI Registered Mutual Fund Distributor (ARN - 90746),
SIF Distributor, APMI Registered PMS Distributor

We deliver unbiased, professional, fee-based Financial Planning services to our clients with integrity, objectivity, competence and diligence by building state-of-art infrastructure and support platforms”.

दि. १६ मे २०२६ रोजी SBI Mutual Fund Confluence 2026 या कॉन्फरन्स मध्ये SWS चे सी.ई.ओ.  श्री. रघुवीर अधिकारी आणि  आमचे मु...
26/05/2026

दि. १६ मे २०२६ रोजी SBI Mutual Fund Confluence 2026 या कॉन्फरन्स मध्ये SWS चे सी.ई.ओ. श्री. रघुवीर अधिकारी आणि आमचे मुंबई शाखा प्रमुख श्री. किशोर काळे यांनी सहभाग घेतला. 🌟

“Coming Together to Create Wealth” या संकल्पनेवर आधारित या कॉन्फ्लुएन्समध्ये वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी वक्ते आणि व्यावसायिक यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमातील विविध सत्रांमधून —
✔️ गुंतवणूक धोरणे
✔️ मार्केटविषयक दृष्टीकोन
✔️ व्यवसायवृद्धीच्या संधी
✔️ भारताची जागतिक आर्थिक भूमिका
यांसारख्या विषयांवर अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

अशा व्यासपीठांमुळे नव्या संकल्पना, व्यावसायिक नेटवर्किंग आणि सातत्यपूर्ण शिकण्याची प्रेरणा मिळते !!

मध्यपूर्वेतील युद्ध संघर्षाचा भारतावर संभाव्य परिणाम- अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्...
23/05/2026

मध्यपूर्वेतील युद्ध संघर्षाचा भारतावर संभाव्य परिणाम

- अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः ऊर्जा क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्याचे थेट परिणाम भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दिसू शकतात. उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञ उदय कोटक यांनी याच पार्श्वभूमीवर भारताला “सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा” इशारा दिला आहे. त्यांच्या मते, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर दबाव वाढू शकतो....

– अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर....

16/05/2026

किती म्हणजे पुरेसे?

- आपण सर्वजण आयुष्यात प्रगती करू इच्छितो. अधिक कमाई, अधिक बचत, अधिक गुंतवणूक, अधिक सुरक्षितता – हे सर्व स्वाभाविक आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित हवे, असे वाटत असते. प्रत्येक कुटुंबाला स्थैर्य हवे असते. त्यामुळे संपत्ती निर्माण करणे चुकीचे नाही उलट ते आवश्यकच आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो – “किती म्हणजे पुरेसे?” गुंतवणुकीच्या जगात एक समज पक्का झालेला आहे – अधिक म्हणजे नेहमीच चांगले....

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. मानसोपचारतज्ज्ञ, संवेदनशील विचारवंत आणि मानवी मनाचा अत्यंत...
15/05/2026

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. मानसोपचारतज्ज्ञ, संवेदनशील विचारवंत आणि मानवी मनाचा अत्यंत सखोल अभ्यास असलेले लेखक म्हणून त्यांनी समाजाला एक वेगळा दृष्टिकोन दिला. आमच्यासाठी — विशेषतः SWS Financial Solutions Pvt. Ltd. च्या स्टाफ आणि ग्राहकांसाठी — “Money चे अंतरंग” या एकदिवसीय कार्यशाळेत त्यांनी पैसा, भावना आणि मानवी वर्तन यांच्यातील नातं अतिशय सहज, सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने उलगडून दाखवलं.

२०१७ मध्ये SWS Financial Solutions Pvt. Ltd. आणि National Association for the Blind यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “Money चे अंतरंग” या आर्थिक साक्षरता कार्यशाळेसाठी त्यांनी विशेष अभ्यासक्रम तयार करून दिला होता. त्या कार्यशाळेत त्यांनी आर्थिक नियोजनामध्ये भावना आणि विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. पैशाबाबत आपले मन अधिक जागरूक कसे बनवायचे, विविध मानसिक सापळ्यांतील योग्य-अयोग्य विचार ओळखून संपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे, आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून आयुष्यातील खरा आनंद व श्रीमंती कशी अनुभवायची — हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यामुळे आर्थिक साक्षरतेला मानवी संवेदनांची एक वेगळीच जोड मिळाली.

आमच्या कुटुंबाशी त्यांचा संबंधही तसा जुना आणि आत्मीयतेचा होता. त्यांचे वडील प्रा. मधुसुदन नाडकर्णी हे जळगावच्या मुळजी जेठा कॉलेजमध्ये माझ्या काकांना रसायनशास्त्र हा विषय शिकवत होते. माझ्या काकांनी “माणसं जनातली, माणसं मनातली” या पुस्तकात त्यांच्यावर एक सुंदर लेखही लिहिला आहे.
(https://alparambhablog.blogspot.com/2021/01/blog-post_9.html?m=1)

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी असलेला संबंध हा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता; तो कायमच वैचारिक आणि प्रेरणादायी राहिला. मग ती ठाण्यातील REBT ची आठ दिवसांची कार्यशाळा असो, किंवा उद्योजकांसाठी खास तयार केलेला “संवर्धन” हा सहा महिन्यांचा उपक्रम असो — त्यांनी आम्हाला भरभरून दिलं, विचारांनी समृद्ध केलं.

२०१७ च्या कार्यक्रमानंतर एका चर्चेदरम्यान मी त्यांना सांगितले होते की Behavioural Finance या विषयावर मराठीत जवळजवळ काहीच लिखाण उपलब्ध नाही. या विषयावरील बहुतांश लेखक आणि संदर्भ परदेशातील असल्यामुळे भारतीय समाजजीवनातील उदाहरणे आणि वास्तव त्यात जाणवत नाही. त्यामुळे मराठी वाचकांसाठी भारतीय संदर्भातून या विषयावर लिखाण होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी विनंती मी त्यांना केली.

त्यांनी ती कल्पना अत्यंत उत्साहाने लगेच स्वीकारली. इतकंच नव्हे, तर अत्यंत त्वरेने त्यांनी सुरुवातीचे चार लेख लिहून मला दिले. ते लेख आपण “मनो Money” च्या अंकात प्रकाशितही केले. मानवी मन, पैसा आणि निर्णयप्रक्रिया यांचा भारतीय आणि मराठी संदर्भातून घेतलेला तो वेध अत्यंत मौलिक आणि विचारप्रवर्तक होता. या लेखाच्या शेवटी त्या चारही लेखांच्या लिंक देत आहे.

त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की २०२७ मध्ये Behavioural Finance या विषयावर मराठीत पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. दुर्दैवाने, हा अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित प्रकल्प आता अर्धवट राहणार, ही खंत मनाला सतत जाणवत राहील.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दिलेले विचार, संवेदनशीलता आणि समाजाला दिलेली वैचारिक दिशा कायम प्रेरणा देत राहील.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

- रघुवीर अधिकारी
_____________________________________________________________________________________________________

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया
दे बुद्धी देवराया
_____________________________________________________________________________________________________

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक पहिला) : पैसा आणि माणसाचे मन – मनोगती – On Mind's Trail
ln.run/aRYbm

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक दुसरा) : माझ्या मनातला पैसा – मनोगती – On Mind's Trail
ln.run/8DEhM

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक तिसरा) : ही निकामी आढयता का? – मनोगती – On Mind's Trai
ln.run/Mwz65

पैसा किती मोठ्ठा? (लेखांक चौथा) : ‘मौल्यवान’ अनुभव कशाला म्हणायचं? – मनोगती – On
ln.run/JBIu7

09/05/2026

आर्थिक सल्लागाराचे महत्त्व !

- आर्थिक निर्णय घेताना आपण स्वतःला अत्यंत तर्कशुद्ध, अभ्यासू आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. परंतु वास्तव थोडे वेगळे आहे. “वर्तनात्मक अर्थशास्त्र” (Behavioral Finance) आपल्याला सांगते की, माणूस हा पूर्णपणे तर्कशुद्ध वागतोच असे नाही. तो भावनिक असतो. त्याचे निर्णय अनेकदा भीती, लोभ, अति-आत्मविश्वास, टाळाटाळ, किंवा “मला काही होणार नाही” अशा मानसिकतेवर आधारित असतात. माणूस भावनेच्या आधारे निर्णय घेतो. परंतु वित्तीय संस्था व्यवहार करताना केवळ कागदपत्रे, नियम आणि प्रक्रिया पाहतात....

💰 आयुष्यात पैशाची गरज कोणाला नाही ?⏳ जेव्हा, 'उद्या कदाचित काहीतरी कमी पडेल' याची जाणीव होते — त्याच क्षणी माणूस खऱ्या अ...
07/05/2026

💰 आयुष्यात पैशाची गरज कोणाला नाही ?
⏳ जेव्हा, 'उद्या कदाचित काहीतरी कमी पडेल' याची जाणीव होते — त्याच क्षणी माणूस खऱ्या अर्थाने बचत / गुंतवणुकीचा विचार करायला लागतो. 💡
🔑 उणीव ही नकारात्मक नसते. तिचा उपयोग 'जागृतीचा क्षण' म्हणून केला की, तीच उणीव तुमचा उद्याचा मार्ग सुकर करते. 🌱✨

05/05/2026

Address

2nd Floor, Mandlik Pride, Near Hotel Curry Leaves, Jehan Circle
Nashik
422013

Opening Hours

Monday 9:30am - 6pm

Telephone

+912532579993

Alerts

Be the first to know and let us send you an email when SWS Financial Solutions Pvt Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SWS Financial Solutions Pvt Ltd.:

Share