Paise Ki Yatra

Paise Ki Yatra Tax • Investment • Business • Money
Explained in Simple Language 💡

📩 DM for Queries
📞 Paid Consultation & Collaboration

29/05/2026

कॅल्क्युलेटरवर 'GT' बटण दाबून एका सेकंदात फायनल टोटल मिळवा !

हिशोब करताना अजूनही बाजूला कागदावर उत्तर लिहून ठेवताय? मग हे रील तुमच्यासाठीच आहे! 🤯
कॅल्क्युलेटरवर एकाच वेळी गुणाकार, भागाकार किंवा बेरीज करा, आणि कोणत्याही कागद-पेनशिवाय सरळ 'GT' (Grand Total) बटण दाबून एका सेकंदात फायनल टोटल मिळवा! 💸
स्मार्ट व्यापारी बना, वेळ वाचवा आणि तुमचे टूल्स फास्ट चालवा! 🚀
व्हिडिओ आवडल्यास तुमच्या व्यापारी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि फॉलो करा: ✨

28/05/2026

कॅल्क्युलेटरचं 'MU' बटण माहितीये का शेठ?
99% व्यापारी नफा काढताना हीच मोठी चूक करतात! 📉
आपण खरेदी किमतीवर (Cost Price) नफा जोडतो, पण खरा बिझनेसचा नियम सांगतो की प्रॉफिट मार्जिन नेहमी विक्री किमतीवर (Selling Price) मोजला जातो. हा फरक न समजल्यामुळे अनेक प्रामाणिक व्यापारी वर्षानुवर्षे मेहनत करूनही मोठा तोटा सहन करतात. 🤯
तुमच्या कॅल्क्युलेटरमधील 'MU' (Mark-Up) बटण वापरून तुम्ही हा हिशोब एका सेकंदात अचूक करू शकता!
आता तुमची बारी: जर एखादी वस्तू ₹८० ला खरेदी केली आणि त्यावर विक्री किमतीवर २०% प्रॉफिट मार्जिन पाहिजे असेल, तर त्याची विक्री किंमत किती असायला हवी?
उत्तर 'MU' बटण वापरून काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा! 👇

27/05/2026

FY 2025-26 साठी Income Tax Slab मध्ये काय बदल झाले? 🤔📊

तुम्ही Salary Employee असाल, Businessman असाल किंवा Freelancer…
नवीन Tax Slab माहिती असणं खूप गरजेचं आहे ✅

या Reel मध्ये आपण सोप्या भाषेत समजून घेतलं आहे 👇
✔️ कोणत्या Income वर किती Tax
✔️ New Tax Regime चे Slab
✔️ कोणाला फायदा होऊ शकतो
✔️ Tax Planning करताना काय लक्षात ठेवावं

ही माहिती उपयोगी वाटली तर Reel Save करा आणि तुमच्या मित्रांना Share करा 🙌

📌 योग्य Tax Planning = जास्त Saving















26/05/2026

GST Composition Scheme - संपूर्ण माहिती

छोट्या व्यापाऱ्यांसाठी वरदान! 💡 GST Composition Scheme म्हणजे काय? त्याचे फायदे, मर्यादा आणि टॅक्स रेट्स काय आहेत? सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये! तुमच्या व्यवसायासाठी ही स्कीम योग्य आहे का? कमेंट्समध्ये सांगा! 👇

25/05/2026

तुमच्या खिशातल्या १० अंकी नंबरचं डिकोडिंग !

तुमच्या पॅन कार्डवरचे १० अंक तुम्ही कधी नीट पाहिले आहेत का? 🤔
• हे फक्त १० नंबर नाहीत, तर यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षितपणे कोड भाषेत लिहिलेली असते. चौथं अक्षर सांगतं तुम्ही व्यक्ती आहात की कंपनी, तर पाचवं अक्षर थेट तुमच्या नावाशी संबंधित असतं! 💼✨
• तुमचं पॅन कार्ड काढा आणि चेक करा: ✅ ४ थं अक्षर 'P' आहे का? ✅ ५ वं अक्षर तुमच्या आडनावाचं पहिलं अक्षर आहे का?
• अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आणि तुमच्या आर्थिक प्रवासाला सोपं करण्यासाठी 'पैसे की यात्रा' ला फॉलो नक्की करा! 🚀

24/05/2026

हिशोब अगदी सोपा आहे, पण बघूया किती जण बरोबर उत्तर देतात! 🍌💸

दुकानदार A: ५ केळी ६ रुपयांना देतोय.

दुकानदार B: ४ केळी ५ रुपयांना देतोय.

तर मग सांगा, कोणाकडची केळी जास्त स्वस्त आहेत? 'A' की 'B'? तुमचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा! 👇

#मराठी #गणित #कोडे

23/05/2026

ITR file करायची घाई करताय ?

ITR filing सुरू झाली म्हणून लगेच return भरू नका! 🚨
AIS आणि 26AS update होण्याआधी ITR भरली…तर पुढे mismatch आणि Notice येऊ शकते 😳
विशेषतः March चा TDS अनेक वेळा June पर्यंत reflect होतो 📊
म्हणून Smart Taxpayer बना 😎
✔️ AIS check करा
✔️ 26AS verify करा
✔️ मगच ITR submit करा

22/05/2026

माझ्या क्लायंट्सना मी 'असं' बँकिंग समजावतो...

जेव्हा बँकिंगचे इंग्रजी शब्द डोक्यावरून जातात, तेव्हा बाबांची ही जुनी सिस्टीम काम येते!

नेहमी माझे क्लायंट्स मला विचारतात की सर हे करंट, सेव्हिंग्स आणि लोन नक्की काय असतं? मग मी त्यांना माझ्या लहानपणीची आणि बाबांसोबत मार्केटमध्ये केलेल्या शॉपिंगची आठवण सांगतो.

शर्टचा खिसा म्हणजे नक्की काय आणि बायकोची पर्स म्हणजेच लोन कसं असतं? एका मिनिटात समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा!

माहिती मनाला भिडली असेल तर शेअर नक्की करा आणि 'पैसे की यात्रा'ला फॉलो करायला विसरू नका!

21/05/2026

'QRMP Scheme' - छोट्या व्यापाऱ्यांचे टेन्शन कमी करणारी !

दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या कटकटीतून सुटका हवी आहे? मग ही स्कीम तुमच्यासाठीच आहे. 🔹 मर्यादा: ५ कोटींपर्यंत उलाढाल. 🔹 फायदा: वर्षातून १२ ऐवजी फक्त ४ रिटर्न. 🔹 पेमेंट: टॅक्स मात्र दर महिन्याला भरावा लागेल.
हा व्हिडिओ आपल्या व्यापारी मित्रांना शेअर करा आणि माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा! 👇

20/05/2026

बँक लोनसाठी किती वर्षांचे ITR लागत ?

बँक लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे का की किती वर्षांचा ITR लागतो? होम लोन असो वा बिझनेस लोन, तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न तुमची क्रेडिट पात्रता सिद्ध करतात. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा! 🏦📈

19/05/2026

मालक ग्रॅच्युइटी देत नाहीये? घाबरू नका, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे!"

तुमची ५ वर्षे पूर्ण झालीत, कंपनीत १० पेक्षा जास्त लोक आहेत, पण तरीही मालक ग्रॅच्युइटी द्यायला 'नाही' म्हणतोय? 🤨

अनेकांना वाटतं की कंपनी 'रजिस्टर' नसेल तर ग्रॅच्युइटी मिळत नाही, पण हा एक मोठा गैरसमज आहे! आज 'पैसे की यात्रा' मध्ये आपण तुमचे कायदेशीर अधिकार आणि हक्काचे पैसे मिळवण्याचे मार्ग पाहणार आहोत. ⚖️✊

या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलंय: ✅ नोंदणी असो वा नसो, १० कर्मचारी असतील तर ग्रॅच्युइटी द्यावीच लागते. ✅ पैसे न मिळाल्यास 'Labour Commissioner' कडे तक्रार कशी करायची? ✅ उशीर झाला तर चक्रवाढ व्याजासह (Interest) पैसे मिळवण्याचा नियम. ✅ 'Form F' म्हणजे काय आणि नॉमिनेशन का महत्त्वाचं आहे?

हा व्हिडिओ केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर छोट्या व्यावसायिकांसाठी (Employers) सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. माहिती असेल, तरच तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकाल! 🛡️💻

हा व्हिडिओ आपल्या सर्व नोकरी करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा!

Address

PraLaSo Financial Services. Near Police Station, At Post Paldhi, Tal. Dharangaon, Dist. Jalgaon
Paldhi
425103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paise Ki Yatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share