05/10/2024
*विमा का घ्यावा*.
*कर्त्या पुरुषाच्या हाती नियमितपणे येणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण व भविष्यातील खर्चाचे नियोजन असते* कुटुंब सदस्य अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य यासाठी या कर्त्या पुरुषावर अवलंबुन असतात. कर्ता पुरुष हयात असताना उत्पन्न नियमित हाती येत असते म्हणूनच तोपर्यंत कुटुंब निश्चित असते. परंतु कर्त्या व्यक्तीवर अचानक मृत्यूचा चाला पडला किंवा त्याला कायमचे अपंगत्व आले तर त्या कुटुंबावर नुसत्या अडचणी येत नाहीत, तर या अडचणीच्या डोंगरामुळे कुटुंब रस्त्यावर येऊ शकते.
मृत्यू हा निश्चित आहे परंतू केव्हा येईल हे निश्चित नाही म्हणून अकाली मृत्युमुळे होणाऱ्या आर्थिक हानीचे तरतुद करण्याची आवश्यकता निर्माण होते. ही एक अशी तरतूद आहे की, ज्यामुळे अनिश्चिततेच्या जागी निश्चितता आणली जाऊ शकते.
*आयुर्विमा मृत्यूची जोखीम टाळू शकत नाही पण त्यामुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान पुर्णपणे किंवा अंशता भरून काढता येते*. आयुर्विमा हे मुख्यतः जोखमीचे नियोजन करण्याचे साधन आहे. तसेच बचतीचा मार्ग आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात कधीही काहीही होऊ शकते किंबहुना होतेच (रोज कोणतेही वृत्तपत्र पहा किंवा बातम्या ऐका) फक्त मी त्यामध्ये आहे कि नाही याची निश्चित खात्री नाही. पण आज घेतलेली आयुर्विमा पॉलिसी उद्याचे भविष्य निश्चित सांगते म्हणून विमा घ्या आणि निश्चिंत व्हा !
*कोणी मरणार आहे म्हणून विमा केला जात नाही, तर उरणाऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावे*
आयुर्विमा घेण्याची किंमत अल्प असते परंतु न घेण्याची किंमत खूप मोठी असते.
*म्हणून विमा केला जातो*.