Free LIC Servicing & Planing

Free LIC Servicing & Planing LIC

*आर्थिक नियोजन* आर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच. परंतु आर्थिक नियोजनामुळे फक्त तितकाच लाभ होत नाही...
18/05/2021

*आर्थिक नियोजन*
आर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच. परंतु आर्थिक नियोजनामुळे फक्त तितकाच लाभ होत नाही तर त्यातून आपल्याला निर्णय स्वातंत्र्य मिळत असते. कारण आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि आयुष्यातील अनेक निर्णय आपण कोणत्याही परिस्थितीच्या दबावाखाली न येता शांतपणे घेऊ शकतो. संपत्ती निर्मिती ही आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यात एखादी लॉटरी लागेल किंवा अचानक नशीब मेहरबान होईल या मानसिकतेत राहण्यापेक्षा आर्थिक नियोजनातून समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करणे श्रेयस्कर आहे.

संपत्ती निर्मितीसाठी फक्त आपण मेहनत करून होत नाही तर आपण कमावलेल्या पैशालादेखील कामाला लावावे लागते. म्हणजेच चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे, त्यातून बचत करणे आणि मग गुंतवणूक करणे. जोपर्यत आपण हे लक्षात घेत नाही तोपर्यत आर्थिक नियोजनाच्या मार्गावर आपण मार्गक्रमण करू शकत नाही. आर्थिक नियोजन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूया.

1️⃣ *नियमित बचत*
आपल्या मासिक उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य तो आढावा घ्या. अनावश्यक खर्च टाळत दरमहिन्याला बचत करा. ही बचतच भविष्यातील आपल्या समृद्धीची दारे उघडणार असते.

2️⃣ *आर्थिक शिस्त लावून घ्या*
आर्थिक व्यवहारांसंदर्भात शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते. कारण अशी शिस्त असेल तरच दीर्घकालाचे नियोजन करता येते आणि त्याची अंमलबजावणी शक्य होते.

3️⃣ *आर्थिक उद्दिष्टांची आखणी*
आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची आखणी करा. असे केल्याने परिपूर्ण आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.

4️⃣ *आपत्कालीन निधी* अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटासाठी वेगळी तरतूद करणे आवश्यक आहे. यालाच आपत्कालीन निधी म्हणतात. आपल्या मासिक उत्पन्नाच्या साधारण सहापट तरी हा निधी असावा. हा निधी लिक्विड फंडात किंवा बॅंकेच्या मुदतठेवीत ठेवावा. असे केल्यास दीर्घकालावधीसाठी केलेली गुंतवणूक मोडायची वेळ येत नाही.

5️⃣ *नियमित गुंतवणूक* संपत्ती निर्मतीसाठी नियमितपणे गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुदतठेवी, सोने, शेअर, म्युच्युअल फंड, बॉंड्स, पीपएफ, पोस्टाच्या योजना यासारख्या गुंतवणूक प्रकारात नियमित गुंतवणूक केली पाहिजे.

6️⃣ *जोखीम आणि परतावा* गुंतवणूक प्रकार निवडताना आपले वय, उत्पन्न, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घ्या. त्यानुसार गुंतवणूक प्रकाराची विभागणी करा. तरुणवयात इक्विटीसारख्या जोखमीच्या प्रकारात अधिक गुंतवणूक करता येते. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे डेट प्रकारात किंवा निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील गुंतवणूक वाढवत नेली पाहिजे. गुंतवणूक कशी कराल आणि कुठे कराल...

7️⃣ *विमा हवाच*
गुंतवणूक करतानाच आयुर्विमा आणि आरोग्यविमा घ्यायला विसरू नका. विमा हा आपल्या संरक्षणासाठी असतो. आपल्या वैद्यकीय खर्चासाठी आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी विमा अत्यंत आवश्यक आहे.

8️⃣ *आर्थिक सल्लागार* सर्व आखणी करताना आणि त्यावर अंमलबजावणी करताना आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते. कारण ते या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. आपल्या गरजांनुरूप नियोजनाची आखणी ते करू शकतात. आपण ऐकीव माहितीच्या किंवा अपूर्ण ज्ञानाच्या जोरावर केलेले नियोजन आणि गुंतवणूक भविष्यात आपल्याला अडचणीची ठरू शकते किंवा त्यामुळे अपेक्षित लाभ मिळत नाही.

*राहुल कोरे*
*विमाप्रतिनिधी*
*मो.नं.९४२३०४८६११* *[email protected]*

https://youtu.be/aBiARkBD-JIJeevan Shanti Plan Closed on 24/08/2020
21/08/2020

https://youtu.be/aBiARkBD-JI
Jeevan Shanti Plan Closed on 24/08/2020

इस वीडियो में आपको LIC जीवन शांति योजना (तालिका संख्या- 850) के बारे में सभी महत्वपूर्ण जानकारी मिलेगी। यह LIC की सर्वश्रे...

19/08/2020

नमस्कार!
कसे आहात?
आज आपल्याला मुद्दाम संपर्क करण्याचे कारण म्हणजे, आमचा एलआयसी चां एक अत्यंत सुंदर , आयुष्यभर एक निश्चित परतावा देणारा पेन्शन प्लॅन ,व्याज दर कमी करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
आयुष्यात निवृत्तीच्या काळात सदैव अखंड चालू राहू शकणारा एक उत्पन्नाचे साधनं प्रत्येकास हवे असते , शासकीय नोकरीत असणाऱ्यांसाठी ते असते पण इतरांना त्याची स्वतः च उभारणी करावी लागते. आयुष्यातल्या ह्या सगळ्यात मोठ्या गरजेची म्हणजे पेन्शन ची सोय एलआयसी ने *एक रकमी* प्रीमियम असलेल्या *जीवन शांती* या योजनेद्वारे केलेली आहे. आज त्याचे व्याज दर बँका पेक्षा जास्त आहेत व बँका देऊ शकत नाहीत त्यापेक्षा *जास्त* म्हणजे अगदी आयुष्य भराची व्याज निश्चिती या *जीवन शांती* द्वारे निर्धारित करता येते.
सद्य परिस्थितीत असलेले व्याज दर बदलले जाण्याचे संकेत आहेत त्यामुळे *आजच* बँकात इतरत्र पैसा जमा करून ठेवण्या ऐवजी *जीवन शांती* मध्ये गुंतवा व एकदम *निश्चिंत* व्हा!
आपणास इच्छा असल्यास या योजनेची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष भेटीत देऊ करतो.
विचार करा मी आपल्या संपर्काची वाट पाहत आहे. आम्हास आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती!
🙏🏻🙏🏻

नाव:-राहुल रामचंद्र कोरे (विमाप्रतिनिधी)
मोबाईल क्र.:-9423048611

https://youtu.be/8shpDnjQY7I
18/08/2020

https://youtu.be/8shpDnjQY7I

इस Video में LIC की Jeevan Lakshya Policy या कन्यादान पालिसी और Post Office की सुकन्या समृद्धि योजना का Comparision बताया गया है || जानिए क्या है बेहतर ...

Address

Sangola Road Gherdi
Sangola

Alerts

Be the first to know and let us send you an email when Free LIC Servicing & Planing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Free LIC Servicing & Planing:

Share