24/12/2021
_आपल्या अधिक माहितीसाठी...._
AIS... आयकर खात्याचा लक्ष्मीबॉम्ब!
आयकर खात्याच्या वेब पोर्टल वर वर्षभरात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा उघड करण्यात आला आहे.
इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. यात नागरिकांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची माहिती टाकण्यात आली असून ही माहिती न पाहताच कोणी इनकम टॅक्स रिटर्न भरले असेल तर ते चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. कारण आयकर विभाग रिटर्न प्रोसेस करताना AIS मधील माहितीशी रिटर्नमधील माहिती जुळते का याची पडताळणी करणार आहे. AIS मधील माहितीमुळे करचोरीच्या बहुतांश पळवाटा बंद झाल्या आहेत.
पूर्वी 26 AS मध्ये जो डेटा उपलब्ध होता त्यात नव्या AIS मध्ये मोठी भर टाकण्यात आली असून यापुढे आपले रिटर्न जाणकार व्यक्तीकडून भरून घेणे सोयीस्कर राहणार आहे, त्यासोबत आर्थिक व्यवहार करताना अतिशय दक्ष राहणे आवश्यक झाले आहे, कर चुकवून लपूनछपून केले जाणारे आर्थिक व्यवहार त्यामुळे कमी होतील.
AIS मध्ये असे काय "स्फोटक "आहे?
1) कोविडनंतर देशभरात जवळपास 2 कोटी नवे डिमॅट अकाउंट सुरु झाले. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात मोठ्या उलाढाली झाल्या. या प्रत्येक व्यवहाराची माहिती AIS मध्ये आली आहे. नफा, तोटा, डेविडेंट अशी सर्व माहिती आयकर खात्याकडे असल्यामुळे त्याची नोंद न घेता भरलेले रिटर्न नोटीशीला निमंत्रण देऊ शकते. कॅपिटल गेन किंवा लॉसची माहिती भरूनच आपले रिटर्न भरावे लागेल, अन्यथा आपण माहिती लपूविल्याचे सिद्ध होऊन नोटीस येऊ शकते.
2) बँकेतील एफडीवरील व्याज 26 AS मध्ये येत होते. AIS मध्ये त्यासोबतचं बचत खात्यावरील व्याजही समाविष्ट झाले आहे. बचत खात्यावरील 10 हजारापर्यंतच्या व्याजावर आयकर सूट असली तरी 10 हजारापुढील व्याज हे आपले करपात्र उत्पन्न असल्याने त्याची रिटर्नमध्ये नोंद देणे बंधनकारक आहे. एफडीवरील व्याजासोबत आता बचत खात्याचे व्याजही आपल्या उत्पन्नात समाविष्ट करून आपल्या इनकम टॅक्स स्लॅबप्रमाणे त्यावर करही भरणे बंधनकारक आहे.
3) कोविडनंतर अनेक ऑनलाईन व्यवहार वाढले. त्यामुळे आपल्या बँक बचत खात्यावर मोठया उलाढाली होतात. ही उलाढाल आणि खात्यावर ऑनलाईन जमा झालेली रक्कम याची नोंद बँक खात्यात होते, हा डेटाही आयकर खात्याकडे जातो. आपल्या खात्यावर होणाऱ्या 10 लाखापेक्षा अधिक ऑनला